Thursday 19 March 2015

आजचे live cricket update

मेलबोर्न, दि. १९ - रोहित शर्माचे दमदार शतक आणि सुरेश रैनाच्या अर्धशतकाच्या आधारे भारताने बांग्लादेशसमोर विजयासाठी ३०३ धावांचे आव्हान दिले आहे. भारताने ५० षटकांत सहा गडी गमावत ३०२ धावा केल्या असून शेवटच्या षटकांमध्ये रविंद्र जडेजाच्या फटकेबाजीने भारताने ३०० चा टप्पा ओलांडला.
वर्ल्डकपमधील बादफेरीत गुरुवारी भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यात सामना सुरु आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर रोहित शर्मा व शिखर धवन या दोघांनी चांगली सुरुवात करुन दिली. भारताच्या ७५ धावा झाल्या असताना बांग्लादेशच्या गोलंदाजांना ही जोडी फोडण्यात यश आले. शिखर धवन ३० धावांवर यष्टीचित झाला. यानंतर विराट कोहली ३, अजिंक्य रहाणे १९ धावांवर बाद झाला. भारताची स्थिती २८ षटकांत ३ बाद ११५ अशी झाली  यानंतर रोहितने सुरेश रैनासोबत शतकी भागीदारी कर भारताचा डाव सावरला.या जोडीने १२२ धावांची भागीदारी रचली. सुरेश रैना ६५ धावांवर बाद झाला. रोहित शर्माने वन डे कारकिर्दीतील ७ वे तर वर्ल्डकपमधील पहिले वहिले शतक ठोकले. वर्ल्डकपमध्ये फॉर्ममध्ये नसल्याने टीका करणा-या टीकाकारांनाही रोहितने त्यांच्या बॅटने चोख प्रत्युत्तर दिले.
शेवटच्या पाच षटकांमध्ये फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात रोहित शर्मा १३७ तर कर्णधार महेंद्रसिंग धोनी ६ धावांवर बाद झाला. रविंद्र जडेजाने १० चेंडूत ४ चौकार ठोकून २३ धावांची छोटी पण महत्त्वाची खेळी केली.  ५० षटकांत रुबेल हुसैन यॉर्कर टाकून जडेजा व आर. अश्विनला फटकेबाजीची संधीच दिली नाही व भारताचा डाव ५० षटकांत ३०२ धावांवर रोखण्यात त्याला यश आले. बांग्लादेशतर्फे तास्कीन अहमदने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. मशरफे मोर्तझा, रुबेल हुसैन व शकीब अल हसन या तिघांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

No comments:

Post a Comment