Wednesday 18 March 2015

team india ची भामाकेदार सुरवात रोहित famous

मेलबोर्न, दि. १९ - वर्ल्डकपमधील बाद फेरीत बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यात चांगली सुरुवातीनंतर धवन, कोहली व अजिंक्य रहाणे स्वस्तात बाद झाल्याने भारताची स्थिती ३ बाद ११५ धावा  अशी झाली आहे. अर्धशतक ठोकणारा रोहित शर्मा अजूनही मैदानात असून रोहित भारताचा डाव सावरतो याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
वर्ल्डकपमधील दुसरी क्वार्टर फायनल भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यात मेलबोर्न येथे सुरु आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा व शिखर धवन या सलामीवीरांनी चांगली सुरुवात करत भारताला अर्धशतकी सलामी दिली. मात्र फिरकीवर फटकेबाजी करण्याच्या नादात शिखर धवन ३० धावांवर यष्टीचित झाला. ७५ धावांवर भारताला पहिला धक्का बसला. यानंतर विराट कोहलीही स्वस्तात तंबूत परतल्याने भारताची स्थिती २ बाद ७९ धावा अशी झाली. लागोपाठ दोन धक्के मिळाल्यावर रोहित शर्माने संयमी खेळी करत अर्धशतक ठोकले. अजिंक्य रहाणेही स्वस्तात बाद झाला असून भारताने २८ षटकांत ३ गडी गमावत ११५ धावा केल्या आहेत.

हेड टू हेड
भारत व बांगलादेश यांच्यामध्ये आत्तापर्यंत २८ सामने झाले आहेत. यामध्ये २४ सामने भारताने जिंकले असून ३ सामन्यांमध्ये बांगलादेशने बाजी मारली आहे. एक सामन्याचा निकाल लागू शकला नाही.
विश्वचषकमध्ये दोन्ही संघ दोनवेळा एकमेकांविरुद्ध लढले असून दोन्ही संघांनी प्रत्येकी एकवेळा विजय नोंदविला आहे.
सामन्यावर पावसाचे सावट
गट ‘अ’मधील बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यात असणारी खेळपट्टी उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यासाठीही सारखीच असेल. पाटा असणाऱ्या या खेळपट्टीवर धावांचा पाऊस पडेल. दोन्ही संघांचे डोळे हवामानाकडे असतील, कारण गुरुवारी दुपारी किंवा सायंकाळी काही प्रमाणात पावसाची शक्यता आहे.

No comments:

Post a Comment