Sunday 5 April 2015

आश्वासनाचा फक्त ढीग-विजय चोप्रा(In indian politics realities after election )


खरच नरेंद्र मोदी यांनी काही भारतासाठी काही केले का? आस प्रश्न मलाच नाही तुम्हाला पडला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्तापर्यंत केवळ आश्वासने दिली असून, ती पूर्ण करण्यासाठी फारसे काही केलेले दिसत नसल्याचे मत 'पंजाब केसरी'चे मुख्य संपादक विजय चोप्रा यांनी शनिवारी घुमानमध्ये व्यक्त केले. हल्लीच्या जमान्यात जस मुले मोठी झाली कि जस आईबापाना विसरतात त्यातलाच प्रकार काहीसा दिसतोय.
घुमान येथे सुरू असलेल्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये प्रसिद्ध सूत्रसंचालक सुधीर गाडगीळ यांनी त्यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी यांना लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाच्या अनुषंगाने त्यांना प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना चोप्रा यांनी मोदींना मिळालेल्या यशाचे विश्लेषण करताना प्रस्थापित सत्ताधाऱयांविरोधात असलेल्या रोषाचा त्यांना फायदा झाल्याचे मत मांडले. ते म्हणाले, काळे पैसे अजून परत आणण्यात आलेले नाहीत. महागाईही अजून कमी झालेली नाही. त्यांनी आश्वासने खूप दिलेली आहेत. मात्र, अजून ती पूर्ण करण्याच्या दिशेने फारसे काही केलेले दिसत नाही.

No comments:

Post a Comment