Sunday 20 September 2015

रस्त्याच्या बाजूला काही रक्ताचे डागही दिसून आले. म्हणून तो नातेवाईकांना गावला



मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यात एका जिवंत माणसाला रस्त्यात गाडून रस्ता बनवण्यात आला. एका व्यक्तीला पुरून रस्ता बनवल्याचं सकाळी लक्षात आलं. बोहरीबंद तालुक्यातील खडरा गावाची ही घटना आहे.
रस्त्याचं डांबरीकरण सुरू होतं, या दरम्यान खडरा गावचा रहिवासी लटोरी बर्मन गावाशेजारील गावात जत्रेत गेला होता, ४५ वर्षाचा बर्मन प्रचंड नशेत होता. 


  या दरम्यान तो रस्त्याचं काम सुरू असलेल्या साईटच्या बाजूला जाऊन पडला.
रस्ता बनवण्याचं काम रात्री सुरू होतं, एका मरूम भरलेला डंपर आला आणि त्याने डंपर दारूच्या नशेत पडलेल्या व्यक्तीच्या अंगावर उपसला. यानंतर यावर सपाटीकरण होऊन सकाळ होण्याआधी रस्ता देखील तयार झाला
सकाळ झाली घरी येत नाही म्हणून, बर्मनच्या नातेवाईकांनी त्यांची शोधाशोध सुरू केली, त्याला काही लोकांनी जत्रेत पाहिलं होतं, म्हणून कुटुंबियांनी जत्रेच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याच्या दिशेने शोधाशोध केली. एका ठिकाणी रस्त्याच्या बाजूला त्याच्या चप्पल दिसून आल्या. आणि रस्त्याच्या बाजूला काही रक्ताचे डागही दिसून आले.
यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी खोदकाम करण्यास सांगितल्यावर मृतदेह आढळून आला, मृतदेहाचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं असून डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे


No comments:

Post a Comment