Thursday 15 October 2015

एक धक्कादायक बातमी, आईने अडीच वर्षाची मुलगी तस्कराला सोपवली


 आईने अडीच वर्षाची मुलगी तस्कराला सोपवली हे ऐकून जे मला वाटते आहे, तेच तुम्हाला वाटले असेल .

सीरियात ईसीसीने धुमाकूळ घातला आहे, दहशतवाद्यांच्या कचाट्यात सापडण्यापेक्षा देश सोडलेला बरा, यासाठी युरोपकडे पळ काढणाऱ्या नागरिकांना तस्करांवर विश्वास करावा लागतोय.

सिरियाच्या नागरीक असलेल्या महिला डॉक्टरवर हल्ला झाला, त्यांच्या गाडीवर गोळ्या झाडण्यात आल्या. सिरियाची राजधानी दमिश्कमध्ये डॉ.जिजित एका हॉस्पिटलमध्ये डॉक्टर होत्या, इस्लामिक स्टेटच्या एका माणसाने त्यांना संपर्क करून, इसीसीसाठी काम करण्यास सांगितलं, नाही म्हटल्यावर त्यांना धमकीही देण्यात आली.

मुलीसह देश सोडायचा होता पण...
महिला डॉक्टर जिजित यांनी आपल्या अडीच वर्षाच्या मुलीसह देश सोडण्याचा निर्णय घेतला.

महिला डॉक्टर एका मानवी तस्काराला भेटली, अबू शहाब असं त्याचं नाव होतं, या बदल्यात त्याला ४ हजार युरो देण्यात आले, त्याबदल्यात त्याने ब्राझिलचा बनावट पासपोर्ट दिला.

अखेर अडीच वर्षाच्या मुलीला तस्कराकडे सोपवलं
पण आई डॉ जिजित आणि मुलगी माया एकाच वेळेस प्रवास करू शकत नव्हते, तेव्हा ती कुणीतरी युरोपीय माणसाची मुलगी आहे असं दाखवण्यासाठी तिला त्या तस्करासोबत प्रवास करावा लागणार होता.

No comments:

Post a Comment